महाराणा प्रतापBb aGgYy il Lx iio Nu073n i
| मेवाडनरेश महाराणा प्रताप सिंह | ||
|---|---|---|
| महाराणा | ||
| राजा रविवर्मा यांनी काढलेले महाराणा प्रताप यांचे चित्र | ||
| मेवाडचा ध्वज | ||
| मेवाडची राजमुद्रा | ||
| अधिकारकाळ | इ.स.१५७२-इ.स.१५९७ | |
| राज्याभिषेक | १ मार्च इ.स.१५७२ | |
| राज्यव्याप्ती | मेवाड विभाग, राजस्थान | |
| राजधानी | उदयपुर | |
| पूर्ण नाव | महाराणा प्रतापसिंह उदयसिंह | |
| जन्म | ९ में इ.स.१५४० | |
| कुम्भलगड किल्ला,राजस्थान | ||
| मृत्यू | १९ जानेवारी इ.स.१५९७ | |
| पूर्वाधिकारी | महाराणा उदयसिंह | |
| उत्तराधिकारी | महाराणा अमरसिंह | |
| वडील | महाराणा उदयसिंह | |
| आई | महाराणी जयवंताबाई | |
| पत्नी | महाराणी अजबदेहबाई (एकूण ११ पत्नी) | |
| राजघराणे | सिसोदिया
| |
महाराणा प्रताप सिंह हे मेवाड राज्याचे शासक होते.
अनुक्रमणिका
- १ कुळ
- २ जन्म
- २.१ राज्याभिषेक
- ३ महाराणा प्रताप यांच्यावरील मराठी पुस्तके
कुळ[संपादन]
महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू पराक्रमी राजपूत होते.
जन्म[संपादन]
महाराणा प्रतापसिंह यांचे वडील महाराणा उदयसिंह असून त्यांच्या आईचे नाव महाराणी जयवंताबाई असे होते. महाराणा प्रतापसिंह यांचा जन्म ९ मे इ.स.१५४० या दिवशी कुंभलगड येथे झाला.
राज्याभिषेक[संपादन]
इ.स. १५६८ मध्ये, उदयसिंह दुसरे यांच्या चित्तोड राज्यावर मुघल सम्राट अकबर चाल करून आला. या हल्ल्यात राजे उदयसिंह आणि मेवाडचे राज घराणे किल्ल्यावर शत्रूला ताबा मिळण्याआधी निसटले. उदयसिंह यांनी १५५९ मध्ये उदयपूर शहराची स्थापना केली. महाराज उदय सिंह आणि त्यांची सर्वात प्रिय राणी भातियानी यांचा मुलगा जगमल याने त्यांच्या नंतर राज्यकारभार सांभाळावा अशी महाराजा उदयसिंह यांची इच्छा होती, पण राजे उदयसिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र प्रताप याने परंपरेनुसार राज्य कारभार सांभाळावा अशी सर्व वरिष्ठ मंत्र्यांची इच्छा होती. प्रताप यांच्या राज्याभिषेकाआधी मुख्यमंत्री चुंदावट आणि तोमर रामशाह यानी जगमलला राजवाड्याबाहेर घालवून दिले आणि प्रताप यांस मेवाडचा राजा म्हणून घोषित केले. प्रताप यांची त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजा होण्याची तयारी नव्हती पण राज्यातील मंत्र्यानी जगमल हा राज्य करण्यास असमर्थ असल्याचे प्रताप यांस पटवून दिले.
महाराणा प्रताप यांच्यावरील मराठी पुस्तके[संपादन]
- झुंझार योद्धा राणा प्रताप (अंजली ठाकूर)
- नरव्याघ्र (अनंत तिंबिले)
- प्रणवीर महाराणा प्रताप (डॉ. भारती सुदामे)
- महाराणा प्रताप (परशुराम काटदरे)
- महाराणा प्रताप (मेघा अंबिके)
- महाराणा प्रताप (राजेश शंकर भट्ट)
- महाराणा प्रताप (संध्या शिरवाडकर)
- महाराणा प्रताप - एक ऐतिहासिक अध्ययन (डॉ. नरसिंह परदेशी-बघेल)
- महाराणा प्रताप यांच्या स्फूर्तिकथा (डॉ. रमाकांत देशपांडे)