|
|
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| विशाळगड
|
 विशाळगडावरील एक संरचना
|
|
|
| नाव |
विशाळगड
|
| उंची |
1130 मीटर
|
| प्रकार |
गिरिदुर्ग
|
| चढाईची श्रेणी |
सोपी.
|
| ठिकाण |
कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
|
| जवळचे गाव |
विशाळगड,कोल्हापूर
|
| डोंगररांग |
सह्याद्री
|
| सध्याची अवस्था |
चांगली
|
| स्थापना |
{{{स्थापना}}}
|
विशाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.
कसे जाल?[संपादन]
http://fortsofshivrai.com/sites/default/files/u1/vishalgad1.jpg पुण्याहुन कराडला गेल्यालर पुढे पाचवड फाटा,तेथुन उजवीकडे वळल्यावर २० किमी वर शेडगेवाडी गाव लागते.डावीकडे वळल्यावर ४ किमीवर केकरुड गाव लागते.नंतर नदीवरील पुल ओलांडल्यावर लगेच उजवीकडे वळा.केकरुड घाट,मलकापुर ला कोल्हापुर रत्नागिरी हायवे वर आंबा गावातुन डावीकडे विशाळगडाकडे वाट जाते..
इतिहास[संपादन]
विशाळगडाची उभारणी इ.स. १०५८मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जातो.
साधारण इ.स.१४५३ च्या सुमारास बहामनी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलिक उत्तुजार होय, त्याने प्रथम पन्हाळा किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलिक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलिक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलिक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलिक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. या सैन्यातील एक सरदार मलिक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे.
पुढे शिवाजी महाराजांनी इ.स. १६५९मध्ये हा किल्ला जिंकला व याला विशाळगड हे नाव ठेवले. हा किल्ला मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे. आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवाजी राजांनी करून घॆतलेल्या सुटकेमुळे या किल्लयाचे नाव अजरामर झाले. आणि यासाठी अवघे ३०० मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमामुळे या किल्लयाचे नाव झाले. पुढे शिवाजी राजांचा मृत्यूनंतर संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला. त्यांनी या किल्ल्याची डागडुजी तसेच,पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिले.
कोल्हापूरच्या छत्रपतींचे पंतप्रधान पंत प्रतिनिधी हे विशाळगड येथे राहत असून, ते विशाळगडाचे जहागीरदार होते. त्यानंतर ते मलकापूर येथे राहावयास गेले.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]
वाहनतळावरून गडाकडे जाण्यासाठी एकच वाट आहे. वाटेवरील लोखंडी पूल ओलांडल्यानंतर पायऱ्यांची चढण सुरू होते. चढताना ढासळलेला बुरूज दिसतात. साधारण ३० मिनिटे चालल्यानंतर माणूस गडाच्या सपाटीवर येऊन पोहोचतो. गडावर "हजरत मलिक रिहान' यांचा दर्गा आहे. दरवर्षी इथे हजारो भाविक भेट देतात. याशिवाय गडावर वीररत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे. काळाच्या ओघात किल्ल्याची बरीच पडझड झाली असून सध्या गडावर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत.
किल्क्यावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई यांचे स्मारक आहे.
गडावरील राहायची सोय[संपादन]
गडावर मलिक रेहान साहेब नामक अवलियाचा दर्गा आहे. हे एक जागृत देवस्थान असून दररोज बरेच मुस्लीम व हिंदू भावीक या दर्ग्याला भेट देतात. त्यामुळे गडावर भाविकांना किंवा पर्यटकांना निवासासाठी खोल्या सहज आणिणी वाजवी किंमतीत मिळतात.
गडावरील खाण्याची सोय[संपादन]
गडावर मलिक रेहान दर्ग्याच्या अवतीभवती छोट्या मोठ्या भरपूर खानावळी व हॉटेले असू तिथे पर्यटकांच्या आवडीप्रमाणे शाकाहारी किंवा मांसाहारी भोजन उपलब्ध होऊ शकते.
गडावरील पाण्याची सोय[संपादन]
गडावर पिण्याच्या पाण्याची एकच विहीर असून ती देखील उन्हाळ्यात आटते. उन्हाळ्यात स्थानिक ग्रामस्थ पांढरेपाणी किंवा आंबा गावातून पाणी आयात करतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये इतर वापरासाठी मुबलक पाणी उपलब्ध नसते. परंतु पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष अडचण नाही. गडावरील बहुतेक दुकानांमध्ये किंवा हॉटेलात पिण्याचे पाणी मिळू शकते.
गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]
मार्ग[संपादन]
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथून गजापूर मार्गे थेट विशाळगड्याच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहनाने जाता येथे अथवा आंबा येथून विशाळगडावर जाण्यासाठी वेगळा घाट रस्ता आहे. कोल्हापूरामधून या मार्गे कर्नाटक परीवहन मंडळाच्या दिवसातून चार बसेस विशाळगडापर्यंत जातात. दिवसातून काही वेळेस मलकापुरातून गजापूरमार्गे देखील एस.टी. महामंडळाच्या काही बसेस विशाळगडावर जातात.
जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]
कोल्हापूर वरून गाडीने 3 तास
संदर्भ[संपादन]
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
- गडसंच - बाबासाहेब पुरंदरे
- किल्ले पाहू या - प्र. के. घाणेकर
- गडदर्शन - प्र. के. घाणेकर
- गड आणि कोट - प्र. के. घाणेकर
- इये महाराष्ट्र देशी - प्र. के. घाणेकर
- चला जरा भटकायला - प्र. के. घाणेकर
- साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची - प्र. के. घाणेकर
- सोबत दुर्गांची - प्र. के. घाणेकर
- मैत्री सागरदुर्गांची - प्र. के. घाणेकर
- दुर्गांच्या देशात - प्र. के. घाणेकर
- गड किल्ले गती जयगाथा - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग १ - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग २ - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग ३ - प्र. के. घाणेकर
हे सुद्धा पहा[संपादन]
महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार) |
|---|
बागलाण | मांगी-तुंगी • मुल्हेर • मोरा• हरगड• साल्हेर •सालोटा• चौरगड |
|---|
धुळे | सोनगीर • लळिंग• गाळणा • कंक्राळा• डेरमाळ किल्ला• भामेर किल्ला |
|---|
वणी - सातमाळा | अचला किल्ला • अहिवंत किल्ला• सप्तशृंगी किल्ला • मार्कंडा किल्ला• जवळ्या किल्ला• रवळ्या किल्ला• धोडप किल्ला• कांचना किल्ला• कोळधेर किल्ला• राजधेर किल्ला• इंद्राई किल्ला• चांदवड किल्ला• हातगड किल्ला• कन्हेरागड किल्ला• पिसोळ |
|---|
मनमाड | अंकाई किल्ला • टंकाई किल्ला• गोरखगड किल्ला |
|---|
अजिंठा | कान्हेरगड किल्ला • अंतूर किल्ला |
|---|
नाशिक - त्र्यंबक रांग | घरगड किल्ला • डांग्या किल्ला• उतवड किल्ला •बसगड किल्ला• फणी किल्ला• हरिहर किल्ला• ब्रह्मा किल्ला •ब्रह्मगिरी किल्ला• अंजनेरी किल्ला• रामशेज किल्ला• भूपतगड किल्ला• वाघेरा किल्ला |
|---|
इगतपुरी - कळसूबाई रांग | कुलंग • मदनगड • अलंग • कळसूबाई • अवंढा किल्ला • पट्टा किल्ला • बितनगड किल्ला •त्रिंगलवाडी किल्ला• कावनई किल्ला |
|---|
मुळा खोरे | रतनगड • कलाडगड किल्ला • भैरवगड किल्ला • कुंजरगड किल्ला |
|---|
जुन्नर | हरिश्चंद्रगड • जीवधन • चावंड किल्ला • शिवनेरी • भैरवगड किल्ला • पाबरगड • हडसर • निमगिरी किल्ला • नारायणगड |
|---|
भिमाशंकर | ढाकोबा किल्ला • दुर्ग किल्ला• गोरखगड किल्ला •सिद्धगड किल्ला• पदरगड किल्ला• कोथळीगड किल्ला• तुंगी किल्ला |
|---|
लोणावळा | ढाक किल्ला • भीमगड किल्ला• राजमाची किल्ला •श्रीवर्धन किल्ला• मनोरंजन किल्ला• लोहगड किल्ला• विसापूर किल्ला• तिकोना किल्ला• तुंग किल्ला• तेलबैला किल्ला• घनगड किल्ला• सुधागड किल्ला• सरसगड किल्ला• कुर्डूगड किल्ला |
|---|
पुणे - (मुठा-गुंजवणे-काळ खोरे) | सिंहगड किल्ला • राजगड किल्ला• तोरणा किल्ला •लिंगाणा किल्ला• रायगड किल्ला• पुरंदर किल्ला• वज्रगड किल्ला• मल्हारगड किल्ला |
|---|
भोर - (भोर-महाबळेश्वर-शिवथर) | रोहिडा किल्ला • रायरेश्वर• केंजळगड •कमळगड• चंद्रगड किल्ला• मंगळगड किल्ला • कावळ्या किल्ला |
|---|
महाबळेश्वर - (कोयना-जगबुडी खोरे) | प्रतापगड • मधुमकरंदगड• वासोटा •चकदेव• रसाळगड• सुमारगड• महिपतगड |
|---|
सातारा - (वाई-सातारा-फलटण) | पांडवगड • वैराटगड• चंदनगड • वंदनगड• अजिंक्यतारा• कल्याणगड• संतोषगड• वारुगड • महिमानगड• वर्धनगड |
|---|
कराड | सदाशिवगड • वसंतगड• मच्छिंद्रगड • मोरगिरी• दातेगड |
|---|
कोयनानगर | जंगली जयगड • भैरवगड• प्रचितगड • महिपतगड |
|---|
कोल्हापूर - पन्हाळ | पन्हाळगड • विशाळगड |
|---|
कोल्हापूर(दक्षिण) | भुदरगड • रांगणा किल्ला• मनोहरगड • मनसंतोषगड• कालानंदीगड• गंधर्वगड• सामानगड• वल्लभगड• सोनगड• भैरवगड |
|---|
पालघर | अडसूळ • अशेरी• कोहोज किल्ला •तांदूळवाडी• गंभीरगड• काळदुर्ग• टकमक किल्ला |
|---|
शहापूर | माहुली • आजोबा किल्ला |
|---|
कर्जत - पनवेल | श्रीमलंगगड • चंदेरी• पेब किल्ला •इर्शाळगड• प्रबळगड• कर्नाळा• माणिकगड• सांकशी किल्ला |
|---|
रोहा - (कुंडलिका खोरे) | अवचितगड • घोसाळगड• तळागड •सुरगड• बिरवाडी किल्ला• सोनगिरी किल्ला |
|---|
मंडणगड | सागरगड • मंडणगड• पालगड |
|---|
उत्तर कोकण | तारापूर किल्ला • शिरगाव किल्ला• माहीम किल्ला • केळवे किल्ला• अलिबाग किल्ला• भोंडगड• दातिवरे किल्ला• अर्नाळा किल्ला• वसई किल्ला |
|---|
दक्षिण कोकण | उंदेरी किल्ला • खांदेरी किल्ला• कुलाबा किल्ला • रेवदंडा किल्ला• कोर्लई किल्ला• जंजिरा• पद्मदुर्ग• बाणकोट किल्ला• गोवा किल्ला• कनकदुर्ग• फत्तेगड• सुवर्णदुर्ग• गोपाळगड• विजयगड• जयगड• रत्नागिरी किल्ला• पूर्णगड• आंबोळगड• यशवंतगड (जैतापूर)• विजयदुर्ग• देवगड• भगवंतगड• भरतगड• सिंधुदुर्ग• पद्मदुर्ग• सर्जेकोट• पद्मदुर्ग• राजकोट किल्ला• निवती किल्ला• यशवंतगड (रेडी)• तेरेखोल किल्ला |
|---|
|
महाराष्ट्रातील किल्ले |
|---|
अकोला जिल्हा | किल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला |
|---|
अमरावती जिल्हा | गाविलगड • आमनेरचा किल्ला |
|---|
अहमदनगर जिल्हा | हरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड |
|---|
उस्मानाबाद जिल्हा | नळदुर्ग• परांडा किल्ला |
|---|
औरंगाबाद जिल्हा | अंतुर • दौलताबाद/देवगिरी |
|---|
कोल्हापुर जिल्हा | पन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड |
|---|
धुळे जिल्हा | लळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट |
|---|
नाशिक जिल्हा | अंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला |
|---|
ठाणे जिल्हा | अर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड |
|---|
पुणे जिल्हा | किल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला • भोरगिरी• सिंदोळा किल्ला |
|---|
भंडारा जिल्हा | अंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला |
|---|
रत्नागिरी जिल्हा | अंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड |
|---|
रायगड जिल्हा | अलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड |
|---|
सातारा जिल्हा | अजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर |
|---|
सांगली जिल्हा | बहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी |
|---|
सिंधुदुर्ग जिल्हा | विजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट |
|---|
सोलापूर जिल्हा | सोलापूरचा भुईकोट |
|---|
नागपूर जिल्हा | सिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड |
|---|
जळगाव जिल्हा | अंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला |
|---|
चंद्रपूर जिल्हा | बल्लारशा• किल्ले चंद्रपूर |
|---|
गोंदिया जिल्हा | गोंदियाचा प्रतापगड |
|---|
जलदुर्ग | विजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी |
|---|
|
मराठा साम्राज्याचा इतिहास |
|---|
| राज्यकर्ते |
शिवाजी महाराज · संभाजीराजे · राजारामराजे १ ले · ताराबाई · शाहूराजे १ ले | |
|---|
| पेशवे |
मोरोपंत त्र्यंबक पिंगळे · बाळाजी विश्वनाथ · थोरले बाजीराव · नानासाहेब · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब |
|---|
| अष्टप्रधानमंडळ | शिवकालीन अष्टप्रधानमंडळ · रामचंद्रपंत अमात्य · रामशास्त्री प्रभुणे |
|---|
| प्रमुख स्त्रिया |
जिजाबाई राजे · सईबाई · सोयराबाई · येसूबाई · ताराबाई · अहिल्याबाई होळकर · मस्तानी |
|---|
| सेनापती |
माणकोजी दहातोंडे · नेताजी पालकर · हंबीरराव मोहिते · प्रतापराव गुजर · संताजी घोरपडे · धनाजी जाधव · चंद्रसेन जाधव · कान्होजी आंग्रे |
|---|
| प्रमुख सरदार/सुभेदार |
दादोजी कोंडदेव · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · बाजी प्रभू देशपांडे · मल्हारराव_होळकर · महादजी शिंदे |
|---|
| प्रमुख वीर/मावळे/किल्लेदार |
मुरारबाजी देशपांडे · मानाजी पायगुडे · मायनाक भंडारी · बाजी पासलकर · जिवा महाला |
|---|
| प्रमुख मोहिमा | सुरतेची पहिली लूट |
|---|
| लढाया |
आष्टीची लढाई · कोल्हापूरची लढाई · पानिपतची तिसरी लढाई · पावनखिंडीतील लढाई · प्रतापगडाची लढाई · राक्षसभुवनची लढाई · वडगावची लढाई · वसईची लढाई · सिंहगडाची लढाई · खर्ड्याची लढाई · हडपसरची लढाई · पालखेडची लढाई · पहिले इंग्रज-मराठा युद्ध · दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध · मराठे-दुराणी युद्ध |
|---|
| प्रमुख तह |
पुरंदराचा तह · सालबाईचा तह · वसईचा तह |
|---|
| शत्रुपक्ष |
आदिलशाही · मोगल साम्राज्य · दुराणी साम्राज्य · ब्रिटिश साम्राज्य · पोर्तुगीज साम्राज्य · हैदराबाद संस्थान · म्हैसूरचे राजतंत्र |
|---|
| शत्रू | औरंगजेब · मिर्झाराजे जयसिंह · अफझलखान · शाहिस्तेखान · सिद्दी जौहर · खवासखान |
|---|
| प्रमुख किल्ले |
रायरेश्वर · पन्हाळा · अजिंक्यतारा · तोरणा · पुरंदर किल्ला · प्रतापगड · राजगड · लोहगड · विजयदुर्ग · विशाळगड · शिवनेरी · सज्जनगड · सिंहगड · हरिश्चंद्रगड · रायगड |
|---|
| इतर | शिवराज्याभिषेक · मराठे गारदी · हुजूर दफ्तर · जेम्स वेल्स (चित्रकार) · तंजावरचे मराठा राज्य · कालरेषा |
|---|
| नाणे | शिवराई · होन · मराठ्यांच्या टांकसाळी |
|---|